Get Mystery Box with random crypto!

1..टर्की देशाने आपलं नाव बदलून टर्कीये असं केलंय. 2..१३ वर्षी | 📚 BALBHARATI E BOOK


1..टर्की देशाने आपलं नाव बदलून टर्कीये असं केलंय.

2..१३ वर्षीय भारतीय-अमेरिकन हरिनी लोगानने (Harini Logan) स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी कॉम्पिटिशन २०२२ मध्ये ९० सेकंदाच्या स्पेल-ऑफमध्ये २१ शब्दांचे अचूक स्पेलिंग सांगून प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकली.

3..कर्णधार लिओनेल मेसी आणि आघाडीपटू लौटारो मार्टिनेझ यांच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर अर्जेटिना फुटबॉल संघाने इटलीवर ३-० अशी मात करत पहिल्या फिनालिसिमा चषकाचे विजेतेपद पटकावले. कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेते आणि युरो चषकाचे विजेते यांच्यात यंदा पहिल्यांदाच फिनालिसिमा चषकासाठी सामना खेळवण्यात आला.

4..दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी 'हरिजन' शब्दाऐवजी 'डॉ. आंबेडकर' शब्द वापरण्याचा निर्णय घेतला .

5..● आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन "मानवतेसाठी योग" या संकल्पनेवर आधारित असेल. 21 जून 2022 रोजी भारतासह संपूर्ण जगभरात साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनासाठी आयुष मंत्रालयाने या संकल्पनेची निवड केली आहे.
6..● आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कर्नाटकात म्हैसूर इथं आयोजित करण्यात आला आहे.

7..● कोविड 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना "निरामयतेसाठी योग" अशी होती.

8..गांधीनगर येथील आयआयटी या संस्थेत परम अनंत या सुपर कॉम्प्युटरची करण्यात आली स्थापना

9..● सुप्रसिद्ध सिनेलेखक संजित नार्वेकर यांना यंदाच्या डॉ. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले.

● दहा लाख रुपये, चषक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. माहितीपट क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सिनेसृष्टीतील नामवंत दिग्गजांना हा पुरस्कार दिला जातो.
● डॉ. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठेचा डॉ. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार दरवर्षी दिला जातो.सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक डॉ . व्ही शांताराम हे फिल्म डिव्हिजनशी दीर्घकाळ संबंधित होते आणि 1950 च्या दशकांत ते फिल्म्स डिव्हिजन या संस्थेचे मानद चित्रपट निर्माते राहिलेल्या व्ही शांताराम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार देण्यात येतो.

दहा लाख रुपये, चषक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. माहितीपट क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सिनेसृष्टीतील नामवंत दिग्गजांना हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत, एस. कृष्णमूर्ती, श्याम बेनेगल, नरेश बेदी, विजया मुळये यांसारख्या मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तिरुअनंतपुरममध्ये महिला आमदारांच्या राष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केरळ विधानसभेने ही परिषद आयोजित केली.

नवी दिल्ली येथील प्रगती मैदान येथे आयोजित भारत ड्रोन महोत्सव 2022 या भारतातील सर्वात मोठ्या ड्रोन महोत्सावाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते