Get Mystery Box with random crypto!

राज्य महिला आयोग :- ◆ महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे एक वैधान | 📚 BALBHARATI E BOOK

राज्य महिला आयोग :-

◆ महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे एक वैधानिक मंडळ असून या आयोगाची स्थापना 1993 साली झाली आहे.

◆ आयोगाची प्रमुख उद्दिष्टे :-

◆ महिलांची समाजामधील स्थिती आणि प्रतिष्ठा सुधारणे.

◆ महिलांची मानहानी करणाऱ्या प्रथांचा शोध घेणे आणि त्यावर योग्य प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे. महिलांवर परिणाम करणाऱ्या कायदयांची प्रभावी अंमलबजावणी करणे.

◆ महिलांची समाजामधील स्थिती आणि प्रतिष्ठा यामध्ये सुधारणा तसेच उन्नती करण्या संबंधित सर्व मुद्द्यावर शासनाला सल्ला देणे.

◆ गरजू महिलांना समुपदेशन आणि निःशुल्क कायदेशीर सल्ला देणे.