Get Mystery Box with random crypto!

आयोगाकडून राबविली जाणारी भरतीप्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक व विश | 🔰 Current Affairs Marathi 🔰

आयोगाकडून राबविली जाणारी भरतीप्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक व विश्वासार्ह असावी; याकरिता काही 'चेक्स अँड बॅलन्सेस' ठरविण्यात आले आहेत. प्रत्येक परीक्षेच्या दोन उत्तर तालिका प्रसिद्ध करणे, हा त्याचाच भाग आहे. तथापि, उत्तरतालिका तयार करण्याच्या प्रचलित पद्धतीमुळे निकाल प्रक्रियेस विलंब होत असल्याची बाब आयोगाच्या निदर्शनास आल्याने आयोगाकडून उत्तरतालिकेवरील उमेदवारांचे आक्षेप प्रचलित ऑफलाईन पद्धतीऐवजी ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची तांत्रिक तयारी अंतिम टप्प्यात असून आगामी काळात उत्तरतालिकेवरील आक्षेप ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची सुविधा उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रस्तुत सुधारणेमुळे निकाल प्रक्रिया कमी वेळात पूर्ण करणे शक्य होईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts